Thursday, March 20, 2025
HomeUncategorizedशाळेची सुरवात ठरली अखेरची; चिमुकल्याला ट्रकने चिरडले...!

शाळेची सुरवात ठरली अखेरची; चिमुकल्याला ट्रकने चिरडले…!

गडचिराेली : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. अवघे दाेन दिवसच शाळेत मित्रांसाेबत घालविले. तिसऱ्याही दिवशी त्याच उमेदीने ताे गावापासून १ किमी अंतरावरच्या दुसऱ्या गावातील शाळेत गेला. संपूर्ण दिवस शाळेत घालविला. सायंकाळी सुटी झाली व गावातीलच एका मित्रासाेबत एकाच सायकलवर बसून गावाकडे निघाला. गावालगत पाेहाेचला खरा; पण नियतीला काही वेगळेच मान्य असावे. मागील बाजूने येणाऱ्या भरधाव ट्रकने जाेरदार धडक दिली. यात चिरडून त्याचा मृत्यू झाला.

ही हृदयद्रावक घटना बुधवार, ३ जुलै राेजी तालुक्याच्या वसा येथे घडली. ऋतुराज प्रशांत शिवणकर (११, रा. वसा), असे जागीच ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. १ जुलैपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. पाठ्यपुस्तके मिळतात म्हणून मुले पहिल्या दिवशीपासूनच शाळेत जातात. कुणी डेस्क-बेंच पकडतात, तर कुणाला जुन्या मित्रांना भेटण्याची ओढ लागलेली असते. अशाच ओढीने ऋतुराज हा पहिल्या दिवशीपासूनच वसा जवळच्या पाेर्ला येथील शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत जाऊन अवघे दाेनच दिवस उलटले हाेते. गप्पागाेष्टीत शाळेतील तिसराही दिवस संपला.

सायंकाळी सुटी झाल्यानंतर एका मित्रासाेबत ताे स्वत: सायकल चालवत गावाकडे निघाला. पाेर्लापासून अवघ्या एका किमी अंतरावर गडचिराेली-आरमाेरी राष्ट्रीय महामार्गावर त्याचे गाव. गावाच्या फाट्याजवळ पाेहाेचला. आता गावाच्या रस्त्याने सायकल वळवणार ताेच गडचिराेलीकडून आरमाेरीकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने मागील बाजूने सायकलला धडक दिली.यात त्याचा मित्र बाजूला फेकला गेला तर ऋतुराज हा ट्रकच्या चाकाखाली आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पाेहाेचताच गर्दी उसळली. लगेच पाेलिसांनाही कळविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नाेंदविण्याची प्रकिया सुरू हाेती.

एकुलता एक हिरावला, कुटुंब शाेकमग्न
प्रशांत शिवणकर यांना ऋतुराज हा एक मुलगा हाेता व त्यापेक्षा लहान मुलगी आहे. आपल्या मुलाला ट्रकने चिरडल्याची माहिती हाेताच शिवणकर कुटुंब शाेकसागरात बुडाले. एकुलत्या मुलाच्या जाण्याने नातेवाइकांच्याही अश्रूंचा बांध फुटला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!