तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथील घटना
तुमसर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
तुमसर आगाराची तुमसर-भंडारा-नागपुर जलद एस. टी.बस तुमसरवरून मोहाडीकडे भरधाव जाणाऱ्या एस.टी बसने विरूध्द दिशेने येणाऱ्या हीरो दुचाकीला ज़ोरदार धडक दिली.
दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना आज ५ जुलै रोजी तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथे सायंकाळी सहा वाजता दरम्यान घडली. जिवन गुलाब गोमासे (३०) रा.खरबी असे एस. टी अपघातात ठार झालेल्या विवाहीत तरुणांचे नाव आहे.
सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत गर्दी केली होती. दरम्यान सदर घनटेची माहीती मोहाडी पोलीसांना देण्यात आली. मोहाडी पोलीस घटनास्थळी दाखल होत, सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिवन हा विवाहीत तरुण होता. त्याच्या मृत्यू पश्चात पत्नी,आई,वडील,भाऊ, असा बराच मोठा आप्त गोमासे परिवार आहे.सदर घटनेचा पुढील तपास मोहाडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुधकावरा,बिट अंमलदार भोंगाडे,कुभलकर आदी करीत आहेत.