अकोला : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
सकाळी नळाला पाणी आल्याने मोटार लावून पाणी भरण्याची परिसरात लगबग सुरु होती. दरम्यान पाणी भरण्यासाठी मोटर लावत असताना विजेचा जोरदार झटका बसून तरुणीचा मृत्यू झाला. हि घटना अकोला शहरातील डाबकी रॉड परिसरात घडली. अकोला शहरात मागील काही दिवसात विजेचा झटका बसून चौघांचा मृत्यू झाला आहे.
अकोला शहरातल्या डाबकीरोड परिसरातल्या गजानन नगरमध्ये सदरची घटना घडली. यात संजना अंभोरे (वय १९) हीच मृत्यू झाला आहे. दरम्यान धरणातील पाण्याची कमतरता पाहता अकोला शहराला आठवड्यातून एकच दिवस पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे अकोलेकरांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. यामुळे पाणी आल्यानंतर मोटारीच्या साहाय्याने पाणी भरले जात असते. यामुळे आज आपल्या भागात पाणी पुरवठा करण्यात आल्याने नागरिकांची पाणी भरण्यासाठी लगभग सुरू होती. याच दरम्यान गजानन नगर मधीलच अंभोरे कुटुंब पाणी भरण्यासाठी पाण्याच्या नळाला मोटर जोड़त होते. यावेळी कुटुंबातील संजना हिला जोरदार विजेचा झटका बसला. संजना ही गंभीर स्वरूपात जखमी झाली. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
१५ दिवसांत शॉक लागून ४ जणांचा मृत्यु
अकोला शहरात मागील १५ दिवसांत शॉक लागून चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये घरात खेळत असताना कुलरचा शॉक लागून तीन वर्षाच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे. तर काळेगाव गावात दोघी मावस बहिणींचा कुलरचा शोक लागून मृत्यू झाला होता. याशिवाय अकोला जिल्ह्यात यंदा कुलरचा शॉक लागून तब्बल ८ लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.