Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedआपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे प्रशिक्षण पूर्ण

आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे प्रशिक्षण पूर्ण

गडचिरोली : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर यांचे कडून दिनांक ४ ते ७ जुलै असे चार दिवसीय न‍िवासी बोट चालक प्रशिक्षण तसेच पूरामध्ये बचावाचे प्रात्यक्षिक सराव कार्यक्रम वैनगंगा नदीवरील कोटगल बॅरेज येथे पार पाडण्यात आले.


सदर प्रश‍िक्षणामध्ये ज‍िल्हयातील आपत्तीप्रवण तालुक्यातील स्थान‍िक बोट चालकांना तसेच बचाव पथकाचे सदस्यांना प्रश‍िक्षण देण्यात आले. प्रश‍िक्षणमध्ये बोट हँडलींग, बोट आँपरेटींग, पूराचे वेळी बुडालेल्या व्यक्तीला पाण्याबाहेर काढण्याचे कौशल्य, तसेच घरगुती साहित्यापासून बचाव संसाधने तयार करणे, दोरीच्या सहाय्याने बचाव, गाठीचे प्रकार, पोहण्याचे कौशल्य, इत्यादी बाबी बाबत कौशल्य श‍िकव‍िण्यात आले. उपरोक्त प्रश‍िक्षणामध्ये मोठ्या संख्येने बचाव पथकातील सदस्यांनी तसेच आपदा म‍ित्रांनी सहभाग घेतला.


उपरोक्त प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी संजय दैने, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी व‍िवेक साळुखे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येऊन आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेडडी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे , डिडिएमएस प्रियंका ताजने यांचे उपस्थ‍ितीमध्ये तसेच राज्य आपत्ती प्रत‍िसाद दल,नागपूर यांचे पोलीस न‍िरीक्षक ड‍ि.जे.दाते, पोलीस उपन‍िरीक्षक आय.डब्ल्यु.रंधई,पोलीस उपन‍िरीक्षक ए.स‍ि.उसेंडी, पोलीस उपन‍िरीक्षक एस.डी.कराळे तसेच त्यांचे संपुर्ण पथकाद्वारे प्रश‍िक्षण देण्यात आले. सदर प्रश‍िक्षणामध्ये ज‍िल्हा कार्यालय आपत्ती व्यवस्थान कक्षातील आयटी अस‍िस्टंट अक्षय भानारकर,आपदा म‍ित्र चंद्रशेखर मोलंगुरवार,कल्पक चौधरी, अज‍ित नरोटे,किरण वेमुला तसेच मोठ्या प्रमाणावर स्थान‍िक नागर‍िक उपस्थ‍ित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!