चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांच्या सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमाला चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दांडी आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तिकिटाच्या मुद्द्यावरून झालेला संघर्ष ताजा असताना सत्कार सोहळ्याला महत्व होते
सावली तालुक्यातील व्याहाड-खुर्द या गावी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान यांच्यासह वडेट्टीवार एकाच मंचावर येण्याची प्रतीक्षा होती. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात तिकिटाच्या मुद्द्यावरून झालेला संघर्ष ताजा असताना या सत्कार कार्यक्रमाला राजकीय महत्व होते. मात्र केवळ खा. किरसान यांची वडेट्टीवार यांच्यासह हजेरी, खा. प्रतिभा धानोरकर चंद्रपूर मुख्यालयी कार्यालयात हजर होत्या मात्र त्यानी वडेट्टीवार यांच्यासह एका मंचावर येणे टाळले.