Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedबीडला बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस उपनिरीक्षाच्या गाडीला कारने उडवले; पोलीस जागीच ठार, एकजण...

बीडला बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस उपनिरीक्षाच्या गाडीला कारने उडवले; पोलीस जागीच ठार, एकजण गंभीर जखमी

बीड : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

नेकनूरमधून बीडला बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस उपनिरीक्षकांच्या मोटरसायकलीला भरधाव कारने उडवले. यामध्ये मच्छिंद्र नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश नागरगोजे हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात आज, रविवारी (ता. ७) सकाळी पावणेसातच्या सुमारास येथील कालिंका मंगल कार्यालयाजवळ झाला. याबाबत अधिक माहिती अशी, नेकनूरचे रहिवासी व सध्या दिंद्रुड पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस
मच्छिंद्र श्रीधर नन्नवरे व सिरसाळा पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रमेश धोंडीराम नागरगोजे हे बीडमध्ये बंदोबस्तासाठी होते.

शनिवारी हे दोघे ही मित्र नेकनूर येथे आले होते. आज सकाळी बीडकडे बंदोबस्तासाठी आपल्या मोटरसायकलीवरुन (क्रमांक एमएच २३ एके ९३९७) निघाले होते. घरून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कालिंका मंगल कार्यालयाजवळ पोहोचले असता, मांजरसुंबाकडून नेकनूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारने (एमएच २३ बीसी २१०८) त्यांना रॉंग साईडला जाऊन जोराची धडक दिली. यामध्ये दोघेही मोटरसायकलवरून खाली पडले व कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्यात पडली.

यामध्ये मच्छिंद्र नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश नागरगोजे गंभीर जखमी झाले. त्यांना बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत नेकनूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक तपास नेकनूर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!