Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedमहाराष्ट्रातील जवानाला जम्मू-काश्मिरमध्ये वीरमरण, वर्षभरापूर्वीच झालं होत लग्न

महाराष्ट्रातील जवानाला जम्मू-काश्मिरमध्ये वीरमरण, वर्षभरापूर्वीच झालं होत लग्न

अकोला : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्य दलाला यश आले आहे. मात्र या चकमकीत लष्कराचे 2 जवान शहीद झाले आहेत. यात अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण जंजाळ यांचा समावेश आहे. प्नवीण यांच्या निधनाची माहिती समजताच मोरगाव भाकरे या गावासह संपूर्ण अकोला जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

2019 मध्ये सैन्य दलात दाखल

प्रवीण जंजाळ हे 2019 साली भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांनी जवळपास 5 वर्षे देशसेवा केली. 2023 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. लग्नानंतर एकाच वर्षात प्रवीण शहीद झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

4 महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये बदली

महार रेजिमेंटमध्ये असणारे प्रवीण हे यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती. मात्र चार महिन्यांपूर्वी सैन्यदलाच्या राष्ट्रीय रायफलच्या (विशेष दस्ता) क्रमांक एकच्या तुकडीत कुलगाम जिल्ह्यात त्यांना पाठवण्यात आले होते. याच तुकडीचा सामना दहशतवाद्यांसोबत झाला. यात प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागल्याने त्यांना वीरमरण आल्याची माहिती समोर आली आहे. आता लवकरच त्यांचे पार्थिव मोरगाव भाकरे या गावात आणले जाणार असून त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!