Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedउत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्काराने वृंदा‌ पगडपल्लीवार सन्मानित..

उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्काराने वृंदा‌ पगडपल्लीवार सन्मानित..

गडचिरोली : (उमेश गझपलीवार, तालुका प्रतिनिधी)

बळीराजा पॅलेस गडचिरोली येथे दि. 7 जुलै रोजी झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा- गडचिरोलीच्या वतीने, सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या पुरस्कारासाठी उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कारासाठी “वृंदावन” अभंग संग्रहाची, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या निर्णायक कमिटी द्वारा निवड करण्यात आली होती. स्व. दुधारामजी समर्थ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मनीष दादा समर्थ गडचिरोली यांच्याकडून १००१/- रूपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.बंडोपंत बोढेकर, ग्रामगीताचार्य साहित्यिक चंद्रपूर. विशेष अतिथी मान.प्रा.डा.रजनी वाढई, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,मा.सुनिता तागवान, रचना प्रकाशन आरमोरी मा.डाक्टर चंद्रकांत लेनगुरे अध्यक्ष झाडीबोली,गडचिरोली तसेच मा.अरूण झगडकर, अध्यक्ष झा.ग्रामीण तसेच बरेच मान्यवर उपस्थित होते. वृंदा पगडपल्लीवार या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनासुर्ला येथे कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत.. तसेच त्यांचा वृंदावन अभंगसंग्रह प्रकाशित आहे. त्यांना मिळालेल्या उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कारासाठी सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!