नागपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
बिगर सातबारा शेतकरी संघटना व मानावी हक्क सुरक्षा दल संघटनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली मागणी नागपूर येथील दीक्षाभूमी च्या कब्जातील जागेची शहराच्या आखीव पत्रिकेत मालकी हक्काची नोंद घ्या अन्यथा बिगर सातबारा शेतकरी संघटना व मानावी हक्क सुरक्षा दल संघटनेच्या वतीने संविधान चौकात आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे. मुख्यमत्री एकनाथ शिंदे व उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मुंबई मंत्रालयात सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की नागपूर जिल्ह्यातील महानगर पालिका हद्दीतील मौजा लेंढरा येथील खा क्र 221/ 1 ,222/2 मध्ये 22 एकरात दीक्षाभूमी चा भव्य स्तूप आहे त्याचा नझुल भूमापन क्रमांक 1365,1367 आहे त्यावर दीक्षाभूमी बांधलेली असताना आज रोजी त्यामध्ये जंगली झुडपे, सडक रस्ते, इमारती, पड शेती, ची नोंद आहे सन 1956 रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो दलीत महिला पुरूषांनी धम्म दीक्षा घेतली आहे तेंव्हा पासून ते आजतागायत सदर जागा दीक्षा भूमी च्याच कब्ज्यात आहे त्यानुसार नागपूर शहराच्या हद्दीत येत असलेल्या जागेची नोंद आखीव पत्रिकेत मालकी हक्क म्हणून घेणे अपेक्षित होते परंतु तसे काही झाले नाही म्हणून मानावी हक्क सुरक्षा दलाचे अध्यक्ष तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मानावी हक्क सुरक्षा दलाचे प्रदेश अध्यक्ष अशोक तिडके यानी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदन सादर करून मागणी केली आहे व मागणी पूर्ण न झाल्यास नागपूर येथील संविधान चौकात आमरण उपोषणाचा इशारा निवेदनातून दिला आहे तसेच निवेदनात नमूद केले आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार मंडळ निरीक्षक कर्तव्य आणि कामे नियम 1970 मधील नियम 17 प्रमाणे दीक्षा भूमी च्या मौक्यावर जाऊन पंचनामा, स्थळ निरीक्षण, प्रत्यक्ष मोका पाहणी दीक्षाभूमी स्तूपाचे किती क्षेत्रावर काम केलें आहे कोणत्या वर्षी स्तूप बांधण्यात आला, आज रोजी स्तूपाची स्थिती, तथागत भगवान बुद्ध यांची मूर्ती, महामानाव डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याच्या जागेचे क्षेत्रफळ प्रतिवेदनात्मक अहवाल सादर करून शासन निर्णयाप्राणे खासरा क्रमांक 221/1व 222/2 मध्ये दीक्षाभूमी ची आखीव पत्रिकेत मालकी हक्काची नोंद तात्काळ घेण्यात यावी अन्यथा बिगर सातबारा शेतकरी संघटना व मानावी हक्क सुरक्षा दल संघटनेच्या वतीने नागपूर येथील संविधान चौकात आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे