हिंगणघाट : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
येथील महसूल उपविभागात घरकुल बांधकामासाठी पुरविण्यात येणार्या वाळूच्या नावाखाली लाभार्थ्यांची लूट होत असून त्यांना माती व दगडं मिश्रीत निकृष्ट दर्जाची वाळू पुरविण्यात येत आहे.
या गैरप्रकाराने संतप्त झालेला एक लाभार्थी चक्क तहसीलदाराच्या दालनातच वाळू घेऊन पोहचल्याने काही वेळ तहसील कार्यालयात खळबळ उडाली होती.
घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी नाममात्र दरात शासनाच्या अधिकृत वाळू डेपोमधून वाळू देण्याची योजना महसूल विभागातर्फे राबविण्यात येत आहे. हिंगणघाट नजिकच्या वालधूर येथील घरकुल लाभार्थी कृपाकर बाळबुधे याने शासनाच्या योजनेतून मंजूर झालेल्या घरकुल बांधकामासाठी वाळू मिळावी म्हणून आभासी अर्ज केला. त्यानंतर कृपाकर बाळबुधे यांचा मागणी अर्ज मंजूर करून दारोडा येथील रेती वितरण डेपो मधून जवळपास 4 ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात आली. जवळपास 9 हजार रुपये खर्च करून बाळबुधे यांनी वाळू वाहतुकदाराला घरपोच आणून देण्याची विनंती केली. वाळूसाठा घरी पोहोचल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे बाळबुधे यांच्या लक्षात आले. हा प्रकार बघून संतप्त झालेल्या बाळबुधे यांनी आज गुरुवार 11 रोजी वाळू साठ्यापैकी 1 बोरी वाळू घेऊन थेट तहसीलदार सतीश मासाळ यांचे कार्यालय गाठले. त्यांनी आपली व्यथा तहसीलदार मासाळ यांच्यापुढे मांडली. तहसीलदारांनी मासाळ यांनी चांगली वाळू मिळेल, असे आश्वासन देत परत पाठवले.