चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
मुंबईच्या कंम्पर्ट फौंडेशन द्वारा दरवर्षी शैकडो युवती भगिनींना मासिक पाळी अभियान संदर्भात आरोग्य स्वच्छता वा सॅनिटरी नेपकिनचा पुरवठा नियमिततेने होतो सोबतच व्यावसायिक प्रशिक्षण ग्रंथ भेट तसेच जुनी वा चांगली कपड्याचा ही पुरवठा होतो. याबद्दल शेरील गायकवाड ह्याचे विशेषकोड कौतुक करुन सा. कार्यकर्त्यां सौं नंदा बिहाडे ह्यांनी कंम्पर्थ फाउंडेशन मुंबईचे कार्य आम्हा शैकडो मैल दूर असलेल्या चंद्रपूर भगिनीं युवतीसाठी निस्पृह व भूषणावह असल्याचे गौरवोदगार हॉटेल झणझणीत चंद्रपूर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात काढलेत.याप्रसंगी सर्वश्री देवराव कोंडेकर, संजय डाखोरे, नितीन राव ,सचिन राखोंडे, पूजा पान्हेरकर राजश्री शिंदे, सीमा दुपारे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पा न्हेरकर इत्यादीच्या उपस्थितीत महिला युवतीना सॅनेटरी पॅडचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानी बोबडे, प्रसाद, खुशाल ठलाल ह्यांनी सहकार्य दिले.