मुल : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
पावसाळ्याच्या सुरुवातीला खरीप पिकांची पेरणी केली जाते. धान उत्पादक शेतकरी जून महिन्यात धान पीक पेरणी करतात. मात्र जुलै महिन्यात अजूनही पुरेसा पाऊस पडला नसल्यानें पळे वाढलेले नाहीत. धान पट्ट्यात नदी ,तलाव ,नाले कोरडे पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मुल तालुका धान पिकासाठी प्रसिद्ध असून येथील बहुतांश शेती नैसर्गिक पाण्यावर अवलंबून आहे. काही शेती सिंचन तलावाच्या भरोशावर आहे. यावर्षी पाऊस लांबला असल्याने अनेक शेतातील पिके होणार की नाही याची काळजी शेतकरी बांधवांना लागलेली आहे. मुल तालुक्यात नहरा लगत अनेक शेतकऱ्यांची शेती असल्याने त्यांना असोला मेंढा तलावाचे पाणी सोडा नाहीतर शेतकऱ्यांसोबत या आठवड्यात आंदोलन सुरू करणार असे प्रकाश पाटील यांनी जाहीर केले .या आंदोलनाला तालुक्यातील नांदगाव , बेंबाळ, नवेगाव, चांदापुर, जूनासूर्ला, गडीसूर्ला, फिस्कुटि, राजगड, भवराळा, विरई इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.