नागपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या बरोबरच सोमवारी (दि.15) कमळेश्वर तालुक्यात विजांच्या कडकडासह मुसधार पाऊस झाला. या पावसामध्ये मोहपा येथे अंगावर वीज पडून नवरा-बायकोची मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रभाकर केशव रेवतकर (वय.62) आणि हिराबाई प्रभाकर रेवतकर (वय.55)अशी मृत दांपत्याची नाव आहेत.
सोमवारी जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये मोहपा येथे राहणारे रेवतकर दांपत्य पावसापासून बचावासाठी शेताच्या लगत असलेल्या झाडाखाली उभे असताना अचानक वीज कोसळली. यामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. जोरदार पाऊस सुरू असल्याने शिवारातील कोणाचेही या घटनेकडे लक्ष गेले नाही. पाऊस ओसरल्यावर शेवटी काही महिला शेतातून परत येत असताना त्यांनी दोघेही झाडाखाली पडून दिसले. यानंतर परिवारातील सदस्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे उपचारार्थ आणले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.