Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedमहाराष्ट्र-छत्तीसगढच्या सीमेवर नक्षलवाद्यांमध्ये चकमक; तीन तासांच्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा, पोलीस उपनिरीक्षक...

महाराष्ट्र-छत्तीसगढच्या सीमेवर नक्षलवाद्यांमध्ये चकमक; तीन तासांच्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा, पोलीस उपनिरीक्षक जखमी

गडचिरोली : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.

या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर ठार झालेल्यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला माओवाद्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील कांकेर जिल्ह्यातील पांखाजूर आणि गडचिरोलीच्या जंगलामध्ये ही चकमक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर तीन तास चाललेल्या या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना सध्या पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टर ने गडचिरोलीला रवाना करण्यात आले आहे. सुमारे तीन तास चाललेल्या या चकमक आजूनही काही माओवादी मारल्या गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या परिसरात पोलिसांनी सर्चिंग ऑपरेशन सुरू केले असून कसून तपास सध्या सुरू आहे.

चकमकीत पोलीस उपनिरीक्षक जखमी, हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट

या प्रकरणी हाती आलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुमारे 3 तास चकमक सुरू होती. यात एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टर ने एअरलिफ्ट करून गडचिरोली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे जवनांच्या मदतीसाठी बॅकअप फोर्सही पाठवण्यात आला आहे. जखमी उपनिरीक्षक सतीश पाटील हे महाराष्ट्राच्या C-60 दलात आहेत. त्याच्या डाव्या खांद्याला गोळी लागल्याची माहिती आहे. कांकेर येथील बांदा येथून त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे पाठवण्यात आले आहे

ही चकमक छत्तिसगडच्या कांकेर जिल्ह्यातील पांखाजूर आणि गडचिरोलीच्या जंगलात झाल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीसचे C-60 चे जवान गडचिरोली येथून नक्षल विरोधी अभियानासाठी गेले होते. दरम्यान, दुपारी दीड ते अडीचच्या दरम्यान झारवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात नक्षलवाद्यांशी चकमक झाली. सध्या परिसरात शोध सुरू आहे. सैनिक परतल्यानंतरच अधिक माहिती मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!