Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedवर्धेतील 'या' डॉक्टर जोडप्याचे 'बंटी बबली' ला लाजवेल असे कृत्य!

वर्धेतील ‘या’ डॉक्टर जोडप्याचे ‘बंटी बबली’ ला लाजवेल असे कृत्य!

वर्धा : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

आर्थिक प्रलोभन देत फसवणूक करण्याचे प्रकार नवे नाहीत. तरीही सुशिक्षित म्हटल्या जाणारा मोठा वर्ग त्यास बळी पडत असल्याचे आजही दिसून येते. आर्वी तालुक्यातील वर्ध मनेरी या एका टोकावर असणाऱ्या गावात राहणाऱ्या डॉ. नीलेश राऊत व डॉ. प्रीती राऊत यांचा वर्धेतील कारला चौक परिसरात दाताचा दवाखाना आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी या जोडप्याने एक मार्ग शोधला.

गुंतवणूक केल्यास दामदुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष देणे सूरू केले. त्यासाठी पंजाब, कोलकाता, मुंबई, ठाणे, वर्धा व अन्य शहरात जाळे तयार केले. त्यात काही अडकले. त्यांचे नातेवाईक तसेच इतरांची फसवणूक झाली. या प्रकरणात नागपूर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल झाली. या शाखेच्या पथकाने डॉ. प्रीती राऊत यांना अटक केली असून पती मात्र फरार झाला आहे.

दहिसर येथील विराज सुहास पाटील हा या घोटाळ्याचा सूत्रधार असल्याची माहिती पुढे आली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलूचा सुरज सावरकर याला सोबत घेत पाटीलने नाईन अकॅडेमी नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केट, क्रिपटो करंसी याचे प्रशिक्षण देणार असल्याचे हे लोकांना सांगत. सावज फसले की ५ ते १५ टक्के परतावा मिळवून देण्याचे ते आमिष देत. त्यासाठी ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले जात होते. डॉ. प्रीती व डॉ. नीलेश यांनी पण वर्ध्यातील विविध हॉटेल्स मध्ये सेमिनार आयोजित केले होते. यात लोकांना भुलथापा देत आर्थिक फसवणूक करण्यात आली. सूत्रधार विराज पाटील याच्यावर कोलकाता ईडीने गुन्हा दाखल केला असून अटक करीत त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

सावरकर याच्या सांगण्यानुसार नागपूरचे व्यापारी विक्रम बजाज यांनी गुंतवणूक केल्यानंतर अनेकांनी पण पैसा लावला. आरोपीनी या गुंतवणूकदारांना डमी कंपनीच्या बँक खात्यात पैसे टाकण्यास सांगितले. सुरूवातीस नफा दिसून आला. त्यामुळे या लोकांनी परत मोठ्या प्रमाणात पैसे गुंतविणे सूरू केले. नंतर जेव्हा हे गुंतवणूकदार पैसे काढण्यास गेले तेव्हा पैसे मिळालेच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर बजाज यांनी पोलीस तक्रार केली. ही फसवणूक अडीच कोटीवर रुपयांची असल्याचे सांगितल्या जात आहे. या प्रकरणात सुरेंद्र सावरकर, प्रियंका खन्ना जालंधर, पी. आर. ट्रेडर्सचा प्रिन्सकुमार, एमआर ट्रेडर्सचा राकेश कुमार सिंग, टीएम ट्रेडर्सचा अमन ठाकूर, आरके ट्रेडर्सचा राहुल कुमार अकेला, ठाण्यातील मिलन एंटरप्रायझेस व कोलकाता येथील ग्रीनव्हॅली ऍग्रो यांचे संचालक या प्रकरणात आरोपी आहेत. डॉ. प्रीती हिला अटक करण्यात आली असून तिला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!