जिवती : (प्रतिनिधी कृष्णा चव्हण)
जिवती तालुका हा नक्षलग्रस्त, डोंगराळ ,दुर्गम ,आदिवासी बहुलक्षेत्र, असून हा तालुका शासनाने आकांक्षी तालुका म्हणून जिल्ह्यातून एकच तालुक्याची निवड झालेली आहे पाच तारखेला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री विनय गौडा ,मुख्य कार्यकारी अधिकारी, विवेक जॉन्सन शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनवणे मॅडम ,एसडीओ माने साहेब ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंके समाज कल्याण अधिकारी पेंदाम,तहसीलदार श्री शेंबटवाड, गटविकास अधिकारी श्री भिंगारदिवे ,व अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी व तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस , आशा वर्कर,शिक्षक सर्व विभागाचे कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या समक्ष तहसील कार्यालयात मोठा गाजावाजा करून आकांक्षी तालुका झाल्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. आकांक्षी तालुक्यात आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न सेवा, सामाजिक विकास, पिण्याचे पाणी, स्वच्छता ,आर्थिक समावेश ,व इतर अन्य घटकांना न्याय देऊन या तालुक्याचा विकास चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी अधिकाऱ्याने मोठे भाषने, व घोषणा,या ठिकाणी केलेत. आणि त्यातील 2 नंबरचा मुद्दा शिक्षण यांना मजबूत करण्यासाठी तालुक्यात नियोजन करून आखणी करून शैक्षणिक दर वाढवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिल्यानंतर आठच दिवसात अत्यंत मोठ्या सीतापीने प्रशासनाकडे सद्यस्थितीत मोठे अधिकार असल्याने गेल्या अडीच वर्षापासून प्रशासकीय कारभार असल्याने कोणालाही खबर न कळू देता. याच तालुक्यातील बारा शिक्षकांच्या बदल्या करून जिल्ह्यातील अन्य तालुक्यामध्ये या शाळेतील श्री संकेत हुमणे चिखली खुर्द, दीक्षा कांबळे टेकामांडवा, निकतखान चिखली बुद्रुक, पूजा चिलबुले जिवती, प्रांजली करडपूजे सेनगाव, निखिल मांडवकर दमपूर मोहदा अनिरुद्ध शिवणकर नंदपा रोहन खुणे मर्कागोंदी रजत चोले सेवादास नगर, सरोज ठेंगरे कोलांडी, हिमांशू कांबळे पिट्ठीगुडा2 प्रफुल्ल ठेंगेकर येल्लापूर या बारा गणित इंग्रजी विज्ञान या विषयाचे शिक्षकांना जिल्ह्यातील 14 तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत प्रतिनियुक्ती देण्यात आली परंतु या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयाचे शिक्षक नेल्यास येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी गणित विज्ञान हे कठीण विषय कोण शिकवणार? येथील विद्यार्थी हे हुशार झाले पाहिजे नाहीत का? मग या विद्यार्थ्यांना शिक्षण नको का? या विद्यार्थ्यांवर असा अन्याय का? असा संतप्त सवाल येथील पालक करीत आहेत. कठीण असलेले विषय सोपे करून शिकविण्यासाठी तज्ञ शिक्षक तालुक्यातील काढून जिल्ह्यातील इतर जिल्हा परिषद शाळांना देण्याचे नेमकं प्रयोजन? मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना काय योग्य वाटले ?आणि येथील शिक्षकांना या विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देऊ नये का? असा सवाल तालुक्यातील सर्व स्तरातून पालकातून होऊ लागलेत तेव्हा बाराही शिक्षक इथून प्रतिनियुक्तीने दिल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी शिक्षक येणे नाही ?त्यांचा पगार येथील कार्यालयातील आस्थापनेतून होतो. आणि मग ती जागा तसेच खाली राहते. असा साधा विषय असताना अत्यंत जोखीमने व शांततेने हा आदेश काढून जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यावर अन्याय केला आहे. असा आरोप पंचायत समितीचे माजी सभापती श्री सुग्रीव गोतावळे श्री दत्ता गायकवाड श्री सुमनबाई शेळके श्री संतोष आडे श्रीविजय गोतावळे श्री प्रेम चव्हाण श्री विनोद पवार श्री सुदाम राठोड श्री संतोष थाडगे श्री शबिर भाई यांनी एका निवेदनाद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केले आहे. सात दिवसाच्या आत शिक्षकांची भरती तात्काळ न केल्यास सर्व पालकांच्या वतीने पंचायत समितीला कुलूप ठोकण्यात येईल? असा इशारा देण्यात आला आहे? यावर प्रशासन काय निर्णय घेईल याकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.