चंद्रपूर : (प्रतिनिधी)
चंद्रपूर येथे राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये झालेल्या कार्यक्रमात मुल तालुक्यातील ३१ वर्षापासून विद्यार्थी व विद्यार्थिना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणारी नामांकित संस्था सक्सेस कंप्यूटर एज्युकेशन सेंटर मूल चे संचालक नितीन येरोजवार यांना चंद्रपूर येथे एमकेसीएल सुपर परफार्मन्स अवार्ड देऊन सम्मानित केले. त्या प्रसंगी एमकेसीएल मुंबई येथील जनरल मॅनेजर नटराज कटकधोंड, नागपूर विभागीय रिजनल मॅनेजर शशिकांत देशपांडे, रिजनल मॅनेजर कुंदन रामटेके, चंद्रपूर जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत कांबळे सर या कार्यक्रमाला हजर होते.