मुल : (तालुका प्रतिनिधी)
मूल तालुक्यातील ग्रामपंचायत बेंबाळ हद्दीत काही महिन्यांपासून पाण्याची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. नळाला एक दिवसआड पाणी येत आहे आणि पाणी आले तरी मध्येच गायब होते. थोड्याच वेळात पाणी येणे बंद होते, ही समस्या संपूर्ण गावात आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी खूप हाल होत आहेत ग्रामपंचायत प्रशासनाने या कडे बारकाईने लक्ष देऊन नळाला पाणी लवकरात लवकर चालू करावं अशी मागणी युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता नविन ध्यानबोईवार यांनी केली आहे