Tuesday, February 11, 2025
HomeUncategorizedनागरी येथे प्लॅटफॉर्म उंची व प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर येण्या जाण्याकरिता योग्य मार्ग करून...

नागरी येथे प्लॅटफॉर्म उंची व प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर येण्या जाण्याकरिता योग्य मार्ग करून देण्याकरिता स्टेशन प्रबंधक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून तालुका महामंत्री भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सुरज धात्रक यांनी निवेदन दिले

वरोरा : (तालुका प्रतिनिधी)

दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोज शुक्रवार नागरी येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने नागरी येथील रेल्वे स्टेशन प्रबंधक व रेल्वे अधिकारी यांची भेट घेऊन नागरी रेल्वे स्टेशनवर असलेल्या अनेक समस्यांबाबत सुरज धात्रक व भारतीय जनता पार्टी या मोर्चाचे सचिव पवन डांगरे तुषार बावणे व युवा मोर्चाच्या सदस्यांनी निवेदन सादर करत नागरी रेल्वे स्टेशनवर असलेल्या असुविधेबाबत बाबत चर्चा केली व नागरी वरून वरोरा चंद्रपूर करिता हिंगणघाट वर्धा करिता शेकडो प्रवासी रोज येणे जाणे करतात परंतु मागील काही वर्षापासून नागरी रेल्वे स्टेशन वरती प्लॅटफॉर्मची अवस्था अतिशय वाईट झाली आहे त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहे तो त्रास होऊ नये म्हणून नागरी येथील युवा मोर्चाच्या वतीने रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना निवेदन सादर केले

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!