Tuesday, February 11, 2025
HomeUncategorizedव्यापाऱ्यास गंडविल्या प्रकरणी न्यायालयाने ठोठावली शिक्षा

व्यापाऱ्यास गंडविल्या प्रकरणी न्यायालयाने ठोठावली शिक्षा

धनादेशाचा अनादर ; प्रकरण भोवले

हा भाऊचा कार्यकर्ता व गौण खनिज माफिया होता

सावनेर : (प्रतिनिधी मंगेश उराडे)

सावनेर येथील व्यापाऱ्याकडून २० लाख रुपये एका गौण खनिज माफियाने जुलै २०२० मध्ये व्यवसाया करिता घेतले त्या ऐवजी व्यापाऱ्याला धनादेश दिला हा धनादेश न वटल्याने त्यांनी सावनेर न्यायालयात दाद मागीतली यातील दोन प्रकरणात न्यायाधीश एस आर भरड यांनी आरोपीस १८ लाख १० हजार रुपये आणि दुसऱ्या केस मध्ये ६ लाख १० हजार दंड तसेच १५ – १५ दिवसाचा साधा कारावासाची शिक्षा ठोठावली.

सावनेरचे व्यापारी फिर्यादी लक्ष्मीकांत गोविंद जोशी यांची कडून आरोपी आश्विन अशोकराव कारोकार (३६, वार्ड क्र. १२ कारोकार चौक सावनेर जि. नागपूर ) यांनी २० लाखाची रक्कम घेतली या बदल्यात फिर्यादीला जुलै २०२० मध्ये एच.डी.एफ.सी बँक सावनेर शाखेचा धनादेश दिला फिर्यादीने हा धनादेश वटविण्यासाठी बँकेत टाकला मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटविला गेला नाही तथा धनादेशाचा अनादर झाला यामुळे फिर्यादी जोशी यांनी सावनेर न्यायालयात दोन प्रकरणी केस दाखल केली एक १५ लाखाची आणि दुसरी ५ लाखाची अश्या दोन केसेस होत्या. यामध्ये केस क्र. ०००११८२/२०२० आणि केस क्र.०००११८३/२०२० अश्या दोन केसेस दाखल केल्या प्रकरणी आरोपीवर पराक्रमी लेख अधिनियम कलम १३८ नुसार गुन्हा झाला.
या प्रकरणी न्यायाधीश एस.आर.भरड यांनी निकाल दिला यात दोन्ही प्रकरणात सजा सुनावण्यात आली यामध्ये पंधरा-पंधरा दिवसाचा कारावास आणि एका केस मध्ये १८ लाख १० हजार आणि दुसऱ्या केस मध्ये ६ लाख १० हजार भरण्याचा न्यायालयाने आदेश दिला तद्ववत आरोपी आश्विन कारोकार याना ५० हजाराच्या रुपयाच्या शास्वतीवर जमानत देण्यात आली सदर प्रकरणात आरोपीनी १ महिन्यामध्ये स्थगिती आणली नाही तर आरोपीला दोन्ही केस मध्ये १५ – १५ दिवसांची साधी कैद असा निर्णय न्यायालयाने ५ ऑगस्ट २०२४ सोमवारी दिला आहे.
आरोपी अश्विन करोकार हे समाजसेवी असून काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहे.
फिर्यादी कडून एडोकेट संजय पात्रिकर हे होते

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!