Tuesday, November 12, 2024
HomeUncategorizedअवैध्य रित्या कत्तली करीता घेवून जाणारे जनावर तस्काराचे हातून केले मुक्त स्थानिक...

अवैध्य रित्या कत्तली करीता घेवून जाणारे जनावर तस्काराचे हातून केले मुक्त स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर व पोस्टे गोंडपीपरी यांची गोवंश जनावरे तस्करां विरुद्ध कारवाई

चंद्रपूर : (जिल्हा प्रतिनिधी)

आज दि. 08/08/2024 रोजी गोपनीय बातमीदराकडुन माहीती मिळाली की गडचिरोली कडुन  गोंडपीपरी ते बल्लारशा मार्गाने जनावरांची अवैद्य रित्या ट्रक मध्ये कोंबुन कत्तली करिता घेवून जानार अशी खात्री दायक बातमी मिळाल्या वरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर कडुन गोंडपीपरी ते बल्लारशा रोडवर आक्सापूर चौक येथे सकाळी 08/00 वा. दरम्यान नाकाबंदी लवण्यात आली असता सदर नाकाबंदी मध्ये मौजा गोंडपीपरी कडून दोन ट्रक संशयीतरित्या येताना दिसल्याने त्यांना ईशारा करून थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते न थांबता पळून गेले. त्यांचा पाठलाग केला असता सदर दोन्ही ट्रक चालकांनी आपले ताब्यातील वाहने रोडचे बाजूला लावून जंगलाचे दिशेने पळून गेले. सदरचे वाहने ताब्यात घेवून कत्तली करिता जाणारे गोवंश जनावरे गोशाळेत सोडण्यात आले. सदर कार्यवाहीत दोन ट्रक व एकुण 77 गोवंश जनावरोंची सुटका करण्यात आली सदर कारवाही मध्ये एकुण 57,70,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच पोस्टे गोंडपीपरी यांचे कडुनही अवैछ्यरित्या गोंवश वाहतूक करित असताना नाकांबंदी दरम्यान एक ट्रक

व 44 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असुन एकुण 14,50,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच काल दि. 07/08/2024 रोजी पोस्टे गडचांदूर नी नाकाबंदी दरम्यान एक ट्रक व 34 गोवंशीय जनावरे असा एकुण 21,80,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्हयाचा पदभार स्विकारला तेव्हा पासुन स्थानिक

गुन्हे शखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन यांचे मार्फत अवैदय रित्या गोवंश जनावर वाहतूकीचे एकूण 54 गुन्हे दाखल करण्यात आले असुन एकूण 1412 गाँवश जातीच्या जनावरांची मुक्तता करण्यात आली असुन संपूर्ण जिल्हयात 8,27,39,000/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कामगीरी मा.पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलीस निरीक्षक मनोज गदादे, पो.हवा. दिपक डोंगरे, नापोशि संतोष येलपुलवार, पो.शि.

नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोटे, गोपाल आतकुलवार, अमोल सावे, वैभव पत्तीवार यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!