मुल : (तालुका प्रतिनिधी)
दिनांक 9 ऑगस्ट ला जागतिक आदिवासी दिन शूरवी महिला महाविद्यालयात साजरा करण्यात आला. आदिवासी समाज मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या. या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी International Day of Indigenous People अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला.तेव्हापासून संपूर्ण जगात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो त्याच प्रमाणे भारतात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
शूरवी महिला महाविद्यालय मूल येथे आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमास शूरवी महिला महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्या हर्षा खरासे, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. श्री माता कन्यका सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. कापर्ती सर, संस्थेचे सचिव सुरावार सर याच्या मार्गदर्शनात जागतिक आदिवासी दिनाचा सोहळा संपन्न झाला.