चामोर्शी : (उमेश गझलपेल्लीवार, तालुका प्रतिनिधी)
पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै येथे नुकताच विद्याथ्यांचे शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली. आपल्या देशाचा कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालतो लोकशाहीत निवडणूक संकल्पनेला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थी जीवनात लोकशाही पद्धतीने प्रतिनिधी निवडून देण्याचे धडे मिळावेत भावी जीवनात लोकशाहीतील निवडणूक पद्धतीची ओळख व माहिती व्हावी म्हणून शालेय मंत्रिमंडळाचे गठण करण्यात आले.
* मंत्रिमंडळ खालील प्रमाणे
* शालेय मुख्यमंत्री हार्दीक भांडेकर
* शालेय उप मुख्यमंत्री शिवम कौसल
* परिपाठ व सांस्कृतिक मंत्री संदेश शर्मा
* शापोआ मंत्री हिमांशू वासेकर आणि नैतिक उडाण
* स्वच्छता मंत्री चंदन बारसागडे
* सहलमंत्री कार्तिक कुनघाडकर
* आरोग्यमंत्री संघर्ष दुधे
* क्रीडामंत्री नैतिक पोहनकर
* पर्यावरणमंत्री कार्तिक वासेकर
* मंत्रिमंडळ प्रभारी शिक्षक विजय दुधबावरे
याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते निवडणूक अधिकारी म्हणून गुरुदास सोनटक्के यांनी काम बघितले.