चंद्रपुर : (जिल्हा प्रतिनिधी)
दिनांक 14ऑगस्ट 2024 रोजी समस्त ओ.बी. सी. व्ही. जे.एन. टी. एस. बी. सी. चे विद्यार्थी यांना आवाहन करण्यात येत आहे की शासनाचे सामाजिक न्याय व ईतर मागास व बहुजन कल्याण विभाग द्वारे संचालित जिल्हानिहाय मुले व मुली करिता नविन वसतिगृह सुरू होत आहेत यात सर्व कमी वार्षिक उत्पन्न्न असणारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा स्तरावर मेडिकल, इंजीनियरिंग, बि.एड.,एम.एड., पि.एच.डि विधी, आय.टी.आय. पदविका, ,नर्सिगसह विविध व्यावसायीक शिक्षण घाणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी वय 30 वर्ष चे आत शिक्षण घेणारे सर्व उपरोक्त व्यावसायीक शिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी मान. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त/ अधिकारी व वसतीगृहाच्या प्रवेशप्रक्रियातील अधिकारी याचेशी तात्काळ संपर्क करून विहीत नमुन्यात अर्ज केलेले असलेले व ज्यांनी अर्ज केलेले नसेल त्या 60%चे वर गुणप्राप्त केलेलेल्यांनी अर्ज करुन आपले प्रवेश निश्चित करावे. कारण या 100 मुलांचे वसतीगृह , चव्हाण काॅलोनी चंद्रपुर येथे व 100 मुली स्टेडिअम जवळ टि.वी.टाॅवर रोड चंद्रपुर या ठिकाणी वस्तीगृह सुरू झालेले असुन यात प्रवेश प्रक्रियेत अर्जदार हे चंद्रपुर जिल्हा स्तरावर स्थानिक व्यावसायीक शिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी असावे.या प्रवेश प्रक्रियेत सामाजिक समांतर आरक्षणाचा भाग निश्चित केलेले असून ओ..बी.सी.साठी 48 जागा, विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी 31 जागा, एस .बी.सी करिता 6 जागा, ई.डब्लु.एस करिता 4जागा दिवयांगा करिता 4जागा व अनाथांकरिता 2 जागा व विशेषबाब प्रशासकिय अधिकारी व मंत्री महोदय याचे शिफारशीने 5जागा असे राखीव ठेवलेले असून सर्व विद्यार्थी लाभ घेऊन आपले करिअर घडवावे. मान .जिल्हा अधिकारी चंद्रपुर याचे मार्फत वेळोवेळी ओ.बी.सी, व्ही. जे.एन.टी संघटना व ईतर सामाजिक व राजकीय संघटनानी पाठपुरावा केल्याने तिन चार वर्षा पुर्वी पासून केलेले संघर्षाला यश येऊन सामाजिक न्याय व ईतर मागास व बहुजन कल्याण विभागाद्वारे संचालित ओ.बी.सी.व व्ही जे एन टी एस बी. सी, ई. डब्लु.एस. व अनाथ विद्यार्थी करिता हे वस्तीगृह वरदान ठरणार आहे. आज पर्यंत हि वेगळी सुविधा नव्हती कारण असे की समाज कल्याण विभागाद्वारे व आदिवासी विभागाद्वारे जिल्हा व तालुका स्तरावर विद्यार्थ्यास शासकीय वस्तीगृह संचालित असतात परंतु सदर वसतीगृहाच्या कोट्यात ओ.बी.सी ला मोचकेच जागा, विमुक्त भटक्या जमाती चे मुलांना 5% जागाच म्हणजे 1 -2 जागा असतात. त्यामुळे सदर समाजाचे मुलाना लाभ मिळत नव्हते,.
यावर्षी पासुन जिल्हा स्तरावर सुरू होणारे ओ.बी.सी. वसतीगृहाच्या प्रवेशप्रक्रिया मध्ये विमुक्त भटकया समाजाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी 38% व एस.बी सी चे प्रवर्गासाठी काही जागा राखीव ठेवले हे अत्यंत आवश्यक आहे. व ते अत्यंत संघर्षाने मंजूर झाले या प्रसंगी आनंदराव अंगलवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय विमुक्त भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली चंद्रशाखर कोटेवार , सतिश मालेकर, रतन शिलावार, दिवाकर बावने ,सुबोध चिकटे सह पदाधिकारी शासनाचे व समाजिक न्याय व ईतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे अभिनंदन करून समस्त ओ.बी.सी , विमुक्त भटक्या जमातीचे व ई. डब्लु.एस.,अनाथ ईतर विद्यार्थ्याना जाहीर आवाहन करून उपरोक्त सुविधेचा लाभ घेऊन आपले करिअर घडवावे.असे आनंदराव वाय. अंगलवार सामाजीक कार्यकर्ते एका पत्रकाद्वारे आवाहन करित आहे.