सावली : (तालुका प्रतिनिधी)
सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलाव मध्ये आज हजारो पर्यटक हे फाल पाहण्यासाठी गेले होते त्यातच गडचिरोली जिल्ह्यातील 4 मित्र ही आज आलेले होते.मात्र परत येत असतांना एक मित्र पायाला माती लागली म्हणून पाय धुण्यासाठी नहरात गेला असता पाय घसरला आणि त्यात बुडाला अशी माहिती मिळते आहे.
त्यातच त्याचे इतर तीन मित्र हे वाचविण्यासाठी आरडा ओरड केले मात्र तो वाहत गेला.या घटनेची माहिती पाथरी पोलिसांना माहिती देण्यात आली.लागलीच पोलीस तत्परतेने घटनास्थळी आले. तसेच बचाव साठी कार्य सुरू झाल्याची माहीती पुढे येत आहे. वाहून गेलेल्या युवक हा गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव येथील पवन सेडमाके असल्याचे कळते आहे. व त्याच्या सोबत इतर 3 जण होते अशी माहिती मिळते आहे.