मुल : (तालुका प्रतिनिधी)
दिनांक 15 ऑगस्ट 2024 भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन शूरवी महिला महाविद्यालय मुल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या हर्षा खरासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच प्रा. विक्की बोंदगुलवार यांनी (मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन. स्वातंत्र्य सैनीक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन) अशी शपथ दिली. संस्थेचे अध्यक्ष मान. कापर्ती सर व संस्थेचे सचिव मान. सुरावार सर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थीनींनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झेंडागीत सादर केले.
कार्यक्रम नियोजन प्रमुख प्रा. डॉ. मिनाक्षी राईंचवार, प्रा. विक्की बोंदगुलवार व प्रा.आशिष आष्टनकर यांनी आपली जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली त्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मोठ्या संख्येनी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.