Thursday, March 20, 2025
HomeUncategorizedमित्राला वाचविताना तलावात बुडून युवकाचा मृत्यू

मित्राला वाचविताना तलावात बुडून युवकाचा मृत्यू

चिमूर : (तालुका प्रतिनिधी)

बैल धुण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एक मित्र गावतलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.22) घडली. सायंकाळी साडे तीन वाजताच्या सुमारास युवकाचा मृत्तदेह आढळून आला आहे. चिमूर तालुक्यातील सोनेगाव (वन) येथील रोशन सोनवाणे आणि दागेस घोडमारे दोघे मित्र सकाळी आठ वाजता गावतलावर बैल धुण्यासाठी गेले होते.

बैल धुतल्यानंतर दोघे ही बैलाच्या मागे पोहत गेले होते. अचानक पोहताना दागेस अचानक पाण्यात बुडायला लागला. त्यामुळे सोबत असलेला मित्र रोशन हा त्याच्या मदतीला धावला. रोशन हा पोहण्यात पटाईत होता. त्यामूळे त्याने दागेस पाण्यातून तलावाच्या काठावर काढला. त्याचवेळी रोशनचा पाय तलावात घसरला. दागेसला वाचविताना त्याला दम भरून आला होता. त्यामुळे रोशन खोल खड्ड्यातील पाण्यात बुडाला त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

सदर घटनेची माहिती जीव वाचलेल्या दागेसने गावात येऊन सांगितली. लगेचच नागरिकांनी रोशनला वाचविण्यासाठी तलावाकडे धाव घेतली. चिमूर पोलीस यांना माहिती देत घटनास्थळी दाखल झाले. दुपार पर्यंत त्याचा मृत्तदेह मिळाला नाही. चंद्रपूर सीडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले. चमूला चार वाजताच्या सुमारास तलावातून मृत्तदेह हाती लागला. चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतकाचा शव शवविच्छेदन आणण्यात आला. मात्र मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात रोशनचा जीव गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!