चंद्रपूर : (जिल्हा प्रतिनिधी)
जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर तर्फे घेण्यात आलेल्या योग परिचय व योग प्रवेश पदविका या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा दि. 25/08/2024 रोजी रविवारी, गजानन महाराज मंदिर, सरकार नगर, चंद्रपूर येथे साजरा करण्यात आला. हा सोहळा मंडळाचे अध्यक्ष श्रद्धेय श्री रामभाऊ खांडवे गुरुजी, कार्यवाह श्री मिलिंद वझलवार सर, परिक्षा प्रमुख श्री वसंत नानेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन महाराज मंदिर, सरकार नगर, ट्रस्ट चे अध्यक्ष मा. श्री लक्ष्मणराव धोबे सर होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष डॉ सुरेश महाकुलकर, सोनाली मॅडम, शशांक सर, जेष्ठ योगशिक्षक श्री. गुणवंत गोगुलवार सर, गजानन मंदिर योगवर्ग शाखेचे संचालक श्री नत्थुजी मत्ते सर, चंद्रपूर जिल्हा संघटक श्री मोहन ताटपल्लीवार सर, चंद्रपूरचे परिक्षा प्रमुख डॉ. रवि कटलावार, योग शिक्षक श्री राजन सर, योग शिक्षिका सौ चंद्रकला धोबे मॅडम, तसेच योगसाधक व योगसाधिका, विद्यार्थी उपस्थित होते. या सोहळ्यात आदरणीय श्री खांडवे गुरुजींच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण व योगशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आदरणीय श्री रामभाऊ खांडवे गुरुजींनी अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सौ मनिषा कटलावार यांनी केले तर प्रास्ताविक सौ चंद्रकला धोबे यांनी केले. आभार प्रदर्शन सौ पावडे यांनी केले. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे दरवर्षी निःशुल्क योग परिक्षा घेण्यात येते. पहिली परीक्षा योग परिचय प्रमाणपत्र, हि परिक्षा एस. एन. डी. टी. विद्यापीठाशी संलग्न आहे. त्या नंतर ‘योग प्रवेश पदविका’ व ‘योग प्रवीण ‘ या दोन्ही परीक्षा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी संलग्न आहे. यात विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रशिक्षण दिल्या जाते. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे करण्यात आले.