अवैद्य दारू तस्कर सचिनच्या नकली दारुची शहरात चर्चा
मुल : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
सद्या मुल तालुक्यात ‘वाईन शॉप’ नसल्यामुळे दारू बंदी मध्ये तस्करी करणारे काही तस्कर आता ग्रामीण भागात दारूचा पुरवठा करीत आहेत. व्याहाड आणि चंद्रपूर वरून विदेशी दारू आणत असून देशी दारू मुलच्या काही देशी दुकानातून घेऊन ग्रामीण भागात त्याचा पुरवठा करतात. 2 वर्षांपूर्वी मुल तालुक्यातील चितेगांव येथे नकली देशी दारूचा कारखान्या उत्पादन शुल्क विभागाची धाड पडल्या नंतर नकली दारूची चर्चा रंगली होती. परंतु आता मात्र सचिन नामक अवैद्य दारू तस्कर मुल तालुक्यातील खेडे गावात देशी आणि विदेशी दारूचा पुरवठा करतो. परंतु हा तस्कर मुल येथील देशी दारू दुकानातून 3-4 पेट्या घेऊन चंद्रपूर मधून नकली देशी-विदेशी दारू आणून ग्रामीण भागातील अवैद्य दारू विक्रेत्यांना आपल्या चार चाकी वाहनाने पुरवठा करीत आहे. मूळ चा सावलीचा रहिवासी असलेला सचिन मुल शहरात येऊन अवैद्य दारू विक्री करून चांगलाच माल गोळा केल्याची चर्चा मुल शहरात होत आहे. सचिन च्या नकली ‘दारूमुळे’ दारू तस्करा मध्ये ‘वार’ होण्याची शंका निर्माण झाली आहे.