दि महाराष्ट्र अर्बन च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन
सावली : (तालुका प्रतिनिधी)
सावली शहरातील दि महाराष्ट्र अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी च्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 1 सप्टेंबर ला सकाळी 7 वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
मॅरेथॉन स्पर्धेत दोन गट असून पुरुष, युवा या गटाकरीता 3 किमी अंतर आहे त्यात प्रथम क्रमांक ला 3000, द्वितीय क्रमांक ला 2000 व तृतीय क्रमांक ला 1000 रोख, ट्रॅफि,प्रमाणपत्र,वृक्ष,व मेडल देण्यात येणार आहे तर महिला, मुलींसाठी 2 किमी अंतर आहे त्यात प्रथम क्रमांक ला 2000 ,द्वितीय क्रमांक साठी 1500 व तृतीय क्रमांक ला 1000 रु रोख,ट्रॅफि,प्रमाणपत्र,वृक्ष,व मेडल देण्यात येणार आहे.यात सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
“अखंड गतीतुन सार्थकता” साधत एक पाऊल पुढे टाकीत 1 सप्टेंबर 2024 ला 11 वर्ष पुर्ण होवून 11 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. दि.1 सप्टेंबर रोज रविवारला सकाळी 11 वा. संस्थेच्या कार्यालयात बक्षीस वितरण, 10 वी व 12 वीतील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था त्यात टायगर वन्यजीव रक्षक संस्था सावली महावीर इंटरनेशनल सावली, आपदा ग्रुप, समृद्ध निसर्ग फाऊंडेशन सावली या संस्थांचा तसेच सभासद, अभिकर्ता, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येणार असून याप्रसंगी 100 फळ झाडे वृक्षरोप चे वाटप करण्यात येणार आहे. तरी या मॅरेथॉन स्पर्धेत व कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक सूरज बोम्मावार यांनी केले आहे.