मुल : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
मुल तालुक्यात अवैद्य दारूचा पुरवठा करणाऱ्या सचिन च्या नकली दारू चर्चा मुल शहरात चांगलीच रंगू लागली आहे. मुल तालुक्यातील खेडे गावात अवैद्य दारू विक्रेत्यांना आपल्या ‘शिफ्ट डिझायर’ सफेद रंगाच्या कार ने पुरवठा करीत असल्याची खात्रीदार माहिती समोर आली आहे. 2-4 पेट्या मुल येथून देशी दारू दुकानातून घेऊन आणि नकली दारू चंद्रपूर वरून आणून अवैद्य दारू विक्रेत्यांना पुरवठा करून चांगलाच माल जमा केला आहे. सावली वरून मुल ला येऊन सुरवातीला प्रॉपर्टी च्या कामात सुरवात केला, परंतु त्याच्यात काही त्याला यश मिळाला नाही. त्या नंतर चामोर्शी तालुक्यात कोंबड बाजार भरवत होता. पोलीस वाले तिथे मागे लागल्या नंतर मुल ला एका चाय ची फ्रेंचायसी घेऊन चाय विक्री करत होता. तेही नाही जमलं. त्यानंतर अवैद्य दारू तस्करीत उतरल्या नंतर चांगलीच माया गोळा केला आहे.