ब्रह्मपुरी : (तालुका प्रतिनिधी)
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे विजेचा शॉक लागल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेतपिकांच्या संरक्षणासाठी शेतात सोडण्यात आलेल्या वीजतारांचा स्पर्श झाल्याने ही घटना घडली. ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर या गावात आज सकाळी अकरा वाजता सुमारास घडली. तिघे शेतकरी गणेशपूर या गावातील तर एक शेतकरी चिचखेडा गावातील रहिवासी आहे. प्रकाश राऊत, नानाजी राऊत, युवराज डोंगरे आणि पुंडलिक मानकर अशी मृतांची नावे आहे.