चंद्रपूर (जिल्हा प्रतिनिधी )
आज दिनांक १४/९/२०२४ रोजी मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिमा जनबंधु यांचे आदेशान्वये मा. पोलीस निरीक्षक महेश कोंडावार साहेब स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच मार्गदर्शनात पोउपनि मधुकर सामलवार व पोलीस स्टॉफ स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर असे मिळुन चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, सुगंधीत तंबाकु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणे कामी रवाना होवुन पोलीस स्टेशन, लाठी जिल्हा चंद्रपूर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, नामे एक विसंबा (काल्पनीक नाव शक्तीमान) रा. सकमुर ता. गोंडपीपरी, जि. चंद्रपुर हा त्याचे राहते घरी आपले ताब्यातील मोबाईलवर ऑनलाईन पध्दतीने कलर प्रेडीक्शन गेम खेळवित असल्याबाबत गोपनिय माहीती मिळाल्याने सकगुर ता. गोंडपिपरी जि. चंद्रपुर येथे त्याचे घरी जावुन रेड केली असता सदर विसबां हा आपल्या राहते घरी मोबाईल व लॅपटाप वर कलर प्रेडीक्शन गेम हारजितचा गेम खेळवित असतांना मिळुन आल्याने सदर विसबा बालकाकडुन एक infinix कंपनीचा मोबाईल व infinix कंपनीचा लॅपटाप किमंत अंदाजे ३८०००/- रूपयाचे मुददेमाल जप्त करण्यात आला. तरी जिल्हातील सर्व जनतेला आव्हाहन करण्यात येते की, अश्याप्रकारचे कलर प्रेडीक्शन ऑनलाईन गेम खेळत असल्यास चंद्रपुर जिल्हा पोलीसांना माहीती देण्यात यावी.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु , पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर पोउपनि मधुकर सामलवार, जयंता चुनारकर, घेतन गज्जलवार, किशोर वकाटे, गोपिनाथ नरोटे, अमोल सावे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.