Wednesday, November 13, 2024
HomeUncategorizedमहाराष्ट्र काँग्रेस मधील वाद आता दिल्ली दरबारी, पटोले, धानोरकर, वडेट्टीवारांना पक्ष श्रेष्ठ...

महाराष्ट्र काँग्रेस मधील वाद आता दिल्ली दरबारी, पटोले, धानोरकर, वडेट्टीवारांना पक्ष श्रेष्ठ कडून पाचारण

नागपूर : (सतीश आकुलवार मुख्य संपादक)

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद वाढत असल्याने पक्षश्रेष्ठीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांना शनिवारी दिल्लीत बोलावून घेतले.

काँग्रेसच्या चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काही दिवसांआधी वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात कुणबी समाजाच्या कार्यक्रमात वडेट्टीवारांचे प्रत्यक्ष नाव न घेता यांच्याविरुद्ध वक्तव्य केले होते. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही अल्पसंख्य आपल्यावर राज्य करीत आहेत. आता परिवर्तनाची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. वडेट्टीवार यांनी याबाबत पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी पटोलेंसह धानोरकर आणि वडेट्टीवार यांना दिल्लीला शनिवारी पाचारण केले.

वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू आहे. खासदार बंडू धानोरकर यांच्या अकाली निधानानंतर प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभेवर दावा केला होता तर त्याचवेळी वडेट्टीवार यांनी त्यांची मुलगी शिवानीसाठी जोर लावला. तेव्हापासून या दोन नेत्यांमध्ये मतभेद वाढत गेले आणि धानोरकर यांनी केलेल्या वक्तव्याने ते अधिक गंभीर झाले. त्यामुळे पक्षक्षेष्ठींनी त्यांना बोलावून घेतल्याचे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!