बल्लारपुर विधानसभेत संदिपभाऊ गिऱ्हे यांना मिळत आहे पहिली पसंती…
मुल : (तालुका प्रतिनिधी )
विरई येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ता व ग्रामपंचायत सदस्य संजयजी मोहूर्ले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, मूल येथील राज ठाकरे व आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांनी म्हणाले की, शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारा पक्ष आहे. आपणही समाजकार्य करीत असता त्यामुळे आपणास या पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य करता येईल व सामान्य नागरिकांना मदत करता येईल. यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रोजगार मेळावा असेल, पिक विमा संदर्भात आंदोलन,प्रसंगी सामान्यांना मदत केली. तर शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर वारंवार आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिला.
विरई येथील ग्रामपंचायत सदस्य संजयजी मोहूर्ले,यांच्या नेतृत्व आदित्य वाढई,भाविक निकोडे,रुपेश ववाके,अजय ढोले,मनोज रस्से,वनपाल ववाके,कैलास जराने,अमोल कटारे,आकाश जेंगळे,शुभम ववाके, परमानंद चौधरी,कमलाकर गेडाम,अजय भोयर, रोहित भोयर, तेजस दंडिकवार,ऋषभ वाढई मंगेश वाढई,आकाश सोनुले,निहाल जांभुळे,भोजराज जांभुळे,सचिन वाढई, सचिन जांभळे,क्रिश निकोडे,सौरभ मुवेडवार,साहिल शेंडे,प्रलय वाढई, रोहित नले,अनिकेत शेंडे,राकेश मोहुरले,रंजीत शेंडे,साजिद शेख,वेदांत लेंगुनरे,तेजस सोनुले, किरण भोयर,प्रफुल सोनुले,आकाश ढोले,रोहित चटारे व इतर युवकांनी माझ्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी गळ्यात शिवसेनेचा भगवा दुपट्टा घालून शिवसेना पक्षात त्यांचे हार्दिक स्वागत केले.यावेळी गावातील महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.