अमरावती : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, धारणी, परतवाडा, अंजगाव सुर्जी तालुक्यातील अनेक भागात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवून आले. घरातील वस्तू हलू लागल्याने नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी लागलीच घराबाहेर धाव घेतली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, धारणी, परतवाडा, अंजनगाव सुर्जी तसेच मेळघाटातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य प्रकारचे धक्के लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नागरिक घराच्या बाहेर निघाले. कोणाच्या घरावर आवाज झाला. घरावरील टीनावर सुद्धा आवाज झाला. दरम्यान चिखलदरा, धारणी परिसरात या एकच चर्चेला उधाण आले होते. सर्वांनी एकमेकांना फोन लावून विचारणा करत विचारपूस केली.
कोणत्याही प्रकारची हानी नाही
दरम्यान अमरावती जिल्ह्यात जमविलेल्या भूकंपाचा धक्का हा सौम्य असल्याने यामुळे कुठल्याही प्रकारची वित्त किंवा जीवित हानी झालेली नाही. दरम्यान चिखलदरा, धारणी, परतवाडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे सौम्या झटके जाणवले असल्याची चर्चा सोशल मीडियावर चर्चा होत आहे.