चामोर्शी : (उमेश गझलपेलीवार, तालुका प्रतिनिधी)
तालुका प्रतिनिधी चामोर्शी पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा, कुनघाडा रै. येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी उमेश गझलपेल्लीवार यांची तर उपाध्यक्षपदी आशा भांडेकर यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून विनोद दुधबळे, रविंद्र कुनघाडकर, दिलीप दुधे, आशिष मेश्राम, निलिमा कुनघाडकर, रेखा मडावी, जयश्री भोयर, सायरा शेख, नमिता भांडेकर, जीवनदास सुरजागडे, सुभाजी वासेकर यांची निवड झाली आहे. सभेला सरपंचा अल्का धोड, पोलीस पाटील दिलीप शृंगारपवार प्रामुख्याने उपस्थित होते. निवडून आलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका गीता शेंडे, शिक्षक गुरुदास सोनटक्के, प्रमोद बोरसरे, अनिल दुर्गे, विजय दूधबावरे, अंजली तंगडपल्लीवार, अभिषेक लोखंडे आदींनी अभिनंदन केले आहे. सभेला पालक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.