मुंबई : (सतीश आकुलवार मुख्य संपादक)
धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता गोविंदाला गोळी लागली आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पायाला गोळी लागली आहे. त्याला उपचारासाठी क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बंदूक साफ करताना गोविंदाला गोळी लागल्याचं समोर आलं आहे.
घटनेची माहिती मिळताच तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोविदांची ही लायन्सस रिव्हॉल्वर ताब्यात घेतली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. रक्तस्त्राव बंद होत नसल्यानं त्याची प्रकृती बिघडली आहे. त्याच्यावर अंधेरी येथील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोळी नेमकी कशी लागली?
बंदूक साफ करताना अभिनेता गोविंदाला गोळी लागली आहे. गोविंदा आज पहाटे 5 वाजता घरातून काही कामानिमित्त बाहेर जणार होता, त्यावेळी घरी परवाना असलेली बंदूक साफ करत असताना त्याच्या पायाला गोळी लागली. गोविंदाला क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र अजूनही रक्तस्त्राव थांबला नसल्याची माहिती समोर येत आहे.