चंद्रपूर : (जिल्हा प्रतिनिधी)
शिक्षणाधिकारी माध्यमिक चंद्रपूर वर्ग एक पदाचा कार्यभार वर्ग दोन दर्जा असणाऱ्या श्रीमती निकिता ठाकरे यांना वर्ग एक पदांवरील व्यक्ती उपलब्ध असतांनाही देऊन,शिक्षण विभागातील चुकीच्या पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. खाजगी शाळा शिक्षक संघातर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक चंद्रपूर यांच्या कार्यालयासमोर २८ जुन व दि.१८ सप्टेंबर च्या नागपूर आंदोलनातही या दिलेल्या कार्यभाराचा निषेध करुन निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना पाठविण्यात आले आहे,यावर विधानसभा आचारसंहिता पूर्वी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. आयुक्त शिक्षण कार्यालयाने इतर जिल्हात वर्ग अधिकारी यांना कार्यभाराबाबत स्पष्ट भुमिका घेऊनही चंद्रपूर माध्यमिक विभागासाठी टाळाटाळ करीत होते व त्याच्या कार्यालयाती हितसंबंध जपण्याची भुमिका या मुळेच चार महिने इतका कालावधी लागला आहे.
उपशिक्षणाधिकारी यांचेकडे आहे,मा शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षक प्रतिनिधी यांचे नागपूर बैठक पत्र क्रमांक ९६४/२०२३-२४ दि. ५ मार्च २०२४ विषय क्रमांक २८, शिक्षकेतर कर्मचारी मान्यता वेतन सुरू ठेवण्याबाबत, शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी शिक्षणाधिकारी माध्य.चंद्रपुर यांना सुचना देण्यात आल्या असल्याचे समजते, वेतन काही महिने सुरू ठेवण्याचा निर्णय,नंतर वेतन बंद करणे कर्मचारी यांनी त्यानंतर उच्च न्यायालय याचिका दाखल करून वेतन सुरू ठेवण्याबाबत सहकार्य घ्यावे अश्या प्रकारे नियमबाह्य बाबी नियमित करण्यासाठी प्रयत्न झाले आहे
मा. पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय,नागपूर व चंद्रपूर यांचे प्रसिद्ध पत्रक, दि.२७ सप्टें.२०२४ यांनी पहिल्याच उताऱ्यात ” शिक्षणाधिकारी मॅडम पैसे मागत असुन तुम्ही ते दिल्याशिवाय तुमचे काम होणार नाही असे सांगून तक्रारदारास ७०,००० हजार रुपये लाच रकमेची मागणी केली होती ” असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.खाजगी शाळा शिक्षक संघाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांचेकडे एसआयटी चौकशीची करावी असे सर्वश्री प्रमोद रेवतकर, विजय नंदनवार, ज्ञानेश्वर वाघ, मोरेश्वर मौदेकर, सिद्धार्थ कांबळे,रवींद्र जेणेकर, पुरुषोत्तम टोंगे, प्रमोद रेवतकर,आशिष टिपले, राकेश कुमरे, किशोर दहेकर, गंगाधर खिरटकर, पुरुषोत्तम कामठी,यांनी व्यक्त केले आहे.