Wednesday, November 13, 2024
HomeUncategorizedकुनघाडा रै येथील १५ वर्षीय मानसिक अशक्तपणा ग्रस्त वेदांत भांडेकर या विद्यार्थ्यास...

कुनघाडा रै येथील १५ वर्षीय मानसिक अशक्तपणा ग्रस्त वेदांत भांडेकर या विद्यार्थ्यास राज्य व केंद्र सरकारने पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करावी.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांची मागणी

चामोर्शी : (उमेश गझलपेल्लीवार, तालुका प्रतिनिधी)

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै येथील रहिवाशी साहित्यिक, नाटककार व पत्रकार पुंडलिक भांडेकर यांना दोन मुले असून, वेदांत पुंडलिक भांडेकर वय १५ वर्ष शिक्षण इयता १० वी या मुलास जन्मापासून मानसिक अशक्तपणाचा आजार आहे याकरिता पुंडलिक भांडेकर यांनी आपल्या आयुष्यातील कमावलेला खूप मोठा आर्थिक खर्च वेदांतच्या उपचारासाठी खर्च केले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक दवाखान्यात वेदांतचा उपचार झाला मात्र काहीच सुधारणा झाली नाही व आजही वेदांत मानसिक अशक्तपणाचा रुग्ण असल्याने घरी नेहमी खाटेवरच रहावे लागत आहे. दैनंदिन जीवन क्रिया खाटेवरच करावी लागते व त्याची प्रत्येक सुश्रुषा वेदांतची आई करीत असते व गेल्या दहा वर्षापासून सुश्रुषा या भांडेकर कुटुंबाकडून अविरत सुरू आहे मात्र कुटुंबीयाने कधीच हार मानले नाही
उपचाराकरीता लागणारे दैनंदिन औषध गोळ्या आर्थिक परिस्थिती सुदृढ नसताना सुद्धा सुरू ठेवले आहे व आर्थिक अडचणीमुळे पुंडलिक भांडेकर यांना अनेक समस्या निर्माण होत आहे सदर माहिती राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांना मिळाली व त्यांनी कुटुंबास भेट देऊन वेदांतचे वडील पुंडलिक भांडेकर यांना पुढील उपचारा करिता आर्थिक मदत केली यावेळी बोलताना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी सांगितले गडचिरोली जिल्ह्यातील अशा मानसिक अशक्तपणा ग्रस्त रुग्णांना केंद्र व राज्य सरकारने त्यांच्या पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने केली आहे. यावेळी मार्गदर्शक राहूल झोडे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ता ज्ञानेन्द्र विश्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, विदर्भ सचिव अनिल गुरणुले, देवानंद पाटील खुणे , गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डू खुणे ,भंडारा जिल्हाध्यक्ष नंदू समरित, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश गजपुरे, गडचिरोली जिल्ह्य अध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष , लोकेश डोंगरवार, मुन्ना दहाडे ,कृष्णा वाघाडे, पुरुषोत्तम गोबाडे , महिला आघाडी अध्यक्ष मनिषा मडावी , जिल्हा संघटन सचिव स्वप्निल मडावी, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, मुलचेरा तालुका अध्यक्ष सचिन विश्वास, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!