Tuesday, February 11, 2025
HomeUncategorizedनवरात्र उत्सव भारतीय संस्कृती प्रमाणेच साजरा करा

नवरात्र उत्सव भारतीय संस्कृती प्रमाणेच साजरा करा

राष्ट्रीय महिला परिषद बजरंग दलाचे निवेदन

सावनेर : (ब्युरो चीफ मंगेश उराडे)

सावनेर येथील राष्ट्रीय महिला परिषद बजरंग दलाच्या वतीने सावनेर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिलजी म्हस्के यांना निवेदन सादर करुण नवरात्री उत्सवात आयोजित होत असलेल्या गरबा व दांडीया उत्सव भारतीय परंपरेनुसार साजरा करण्यात यावा याकरिता निवेदन प्रस्तुत करण्यात आले
राष्ट्रीय महिला परिषद बजरंग दल शाखेच्या अध्यक्षा छवी राठोर यांच्या नेतृत्वात पोलीस उपविभागीय अधिकारी अनिलजी म्हस्के यांना दिलेल्या निवेदनातून होऊ घातलेल्या नवरात्री उत्सवादरम्यान गरबा तसेच दांडीया आयोजनात सहभागी मुली, युवती तसेच महिलांनी पुर्ण पारंपरिक वस्त्र परिधान करुणच आयोजनात भाग घेणे, छोठ्या किन्वा कमी वस्त्र परिधान करणाऱ्यांना आयोजनात भाग घेऊ देऊ नये. आयोजन स्थळी नशापान करुण येणारी पुरुष मंडळी अथवा टवाळखोर युवकांना प्रवेश देण्यात येऊ नये,पारंपरिक गरबा व दांडीया संगीतावरच सदर आयोजन करण्यात यावे, सिनेमा अथवा अन्य कर्कश आवाजातील तसेच अश्चील गाण्यांचा वापर होणार नाही याची आयोजकांनी व स्थानिक पोलिसांनी वेळोवेळी दखल घ्यावी. वरिल कु्त्य आढळून आल्यास आयोजकांना दिलेली आयोजनाची परवानगी तात्काळ निरस्त करुण त्यांच्यावर योग्य कारवाई करावी.जेणेकरून होऊ घातलेले नवरात्री उत्सवाचे पावित्र जपल्या जाईल. व यादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही.अश्या आशयाचे निवेदन राष्ट्रीय महिला परिषद बजरंग दल शाखेची अध्यक्षा छवी राठोर यांच्या नेतृत्वात देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रीय महिला परिषदेच्या कु. वेदांती शेळके, रुपाली काळबांडे, जानवी सोमकुवर, मोनीका शर्मा, श्रावणी नानवटकर, वैष्णवी आसोले प्रामुख्याने उपस्थित होत्या.
निवेदनकर्त्यांचे निवेदन स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल म्हस्के यांनी स्विकार करुण गरबा व दांडीया आयोजन करणार्यांना त्या सुचना देऊन पोलीस कर्मचारी ही सदर आयोजनावर जातीने लक्ष ठेवून कुणाचाही धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घेईल असे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!