सावनेर : (प्रतिनिधि नितेश गव्हाने)
महमार्ग पोलीय पाटणसावंगी येथील कर्मचारी,दिनांक 29/09/2024 रोज रविवार दुपारी दोनच्या सुमारास आपली ड्युटी करतांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 47 नागपुर ते पांडुरना रोड वरील वाहन क्रमांक MH 40 KR 4505 चालक चे नामे पंकज प्रभाकर उमप रा. नागपूर वेगाने चालवत असलेल्या चार चाकी वाहन ने ड्युटी बजावत असलेल्या पोलीस हवालदार परेश लुटे याला जोर दार धडक दिल्याने तो गंभीर झाला व त्याला सावनेर येथील सरकारी दवाखाण्यात दाखल केले असता गंभीर मार असल्याने नागपुर येथे खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले.
आज ५ ते ६ दिवस उलटूनही वाहन चालकावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.घटने बाबत महामार्ग पोलीस पाटणसावंगी हेटी चौकीच्या प्रभारी अधीकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सहस्त्रबुद्धे यांनी दोशी वाहन चालका विरुध्द कोणताही अपघाताचा गुन्हा दाखल न करता गाडी सोडण्यात आली, ऑन ड्युटी असलेल्या पोलीस हवलदार परेश लूटे यांचीच चूक असल्याचे अधीकारी बोलून मोकळे झाले व लूटे यांच्यावरच उलट आरोप लावून प्रकरण दाबवीण्यात येत आहे. अपघातग्ररस पीडीत पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटूंब वेदना व दुख सहन करीत आहे. लूटे यांना न्याय न मिळता उलट त्यांची बदनामीच्या प्रकार सुरू आहे, या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याला पोलिसच न्याय मिळवून देत नाही
तसेच पोलीय अधीकारी सहस्रबुद्धे यांची भूमिका संशयस्पद दिसून येत आहे,
असे आरोप लूटे यांची पत्नी यांनी केले आहे व सदर प्रकरणाची न्यायीक चौकशी करण्यात यावी अशी मागणी मिसेस लूटे व काही पोलीस कर्मचाऱ्याकडून होत आहे.