सातारा तुकूम गावाजवळची घटना
पोंभूर्णा : (तालुका प्रतिनिधी)
चंद्रपूर येथील काम आटोपून डोंगर हळदी गावाकडे परत येत असताना सातारा तुकूम गावानजीक टुव्हीलरवरचा ताबा सुटल्याने झाडाला दिलेल्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दि.१२ आक्टोंबर शनिवारला संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.संदेश शामराव लेनगुरे वय(३५) रा.डोंगर हळदी तुकूम असे मृतक युवकाचे नाव आहे.
पोंभूर्णा तालूक्यातील उमरी पोतदार पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या डोंगर हळदी तुकूम येथील संदेश लेनगुरे हा चंद्रपूर येथे कामा निमित्त गेला होता.चंद्रपूर येथील काम आटोपून तो डोंगर हळदी तुकूम गावाकडे टुव्हीलरने परत येत असताना सातारा तुकुम गावानजीक टुव्हीलर क्र. MH 34 BP 5096 गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगतच्या झाडाला धडक दिली या धडकेत त्याच्या डोक्याला जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला.त्याला तात्काळ चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.सदर घटनेचा पुढील तपास उमरी पोतदार पोलिस करीत आहेत.त्याचे पश्चात आई,वडील, पत्नी व दोन छोट्या मुली आहेत.सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.एकीकडे अख्खा गाव प्रसिद्ध असलेल्या घटमाऊली देवस्थानात नवरात्र महोत्सव व दसरा सणाची तयारी करीत असतांना अचानक गावातील युवकाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.गावातील युवकाचा मृत्यू झाल्याने घटमाऊली देवस्थानातील दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.