मुंबई : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
मुंबईतील वांद्रे परिसरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन राऊंड गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सिद्दीकी जखमी झाले होते. बाबा सिद्दीकी यांना जवळच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
पण डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं आहे. गोळीबार कोणी केला याची अद्याप पुष्टी झालेली नाही. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली आहे. घटनास्थळी निर्मलनगर पोलीस पोहोचले असून तपास करत आहेत.
काही महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या मुलावर काँग्रेसने कारवाई केली होती. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे आमदार असून मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती. पण आता काँग्रेसने त्यांना पदावरून हटवलं होतं. वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. अशीही चर्चा आहे की झिशान सिद्दीकी सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे.