Thursday, March 20, 2025
HomeUncategorizedआरमोरीतुन गजबेंना तिसऱ्यांदा तिकीट; होळींचा 'सस्पेन्स' कायम

आरमोरीतुन गजबेंना तिसऱ्यांदा तिकीट; होळींचा ‘सस्पेन्स’ कायम

गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

भाजपने जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांच्या यादीत आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांचा समावेश आहे. मात्र, गडचिरोलीचा उमेदवार अद्याप निश्चित न केल्याने आमदार डॉ. देवराव होळी समर्थकांची धाकधूक वाढली आहे.

गतवेळी भाजपकडे असलेला अहेरी मतदारसंघ मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) वाट्याला जाणार आहे. त्यामुळे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम कुठली राजकीय भूमिका घेतात, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी २० ऑक्टोबरला आपले पते खुले केले. त्यात आरमोरीतून आमदार कृष्णा गजबे यांना तिसन्यांदा संधी मिळाली. उमेदवारी पदरात पाडण्यात गजबे यशस्वी झाले असले तरी लोकसभा निवडणुकीतील मतदारांचा ‘मूह’ पाहता त्यांचा विजयाचा मार्ग आव्हानात्मक असणार आहे. लोकसभा निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रातून महायुतीचे सर्वाधिक ३३ हजार ४२१ इतके मताधिक्य घटले. त्यामुळे आमदार गजबे यांच्या वर्चस्वाला हा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

वाद चव्हाट्यावर, तिकीट कापल्याचे मेसेज

दरम्यान, भाजपमध्ये गटबाजीचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. पहिली यादी जाहीर होण्यापूर्वीच डॉ. देवराव होळी यांचे तिकीट पक्षाने कापल्याचे मेसेज समाजमाध्यमात व्हायरल झाले, त्यामुळे राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत बेबनावाची दिवसभर चर्चा होती.

पहिल्या यादीत होळींचे नाव का नाही?

भाजपच्या पहिल्या यादीत नाव नसल्याने आमदार डॉ. देवराव होळी यांचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ते दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यांच्या उथळ वक्तव्याचे व्हिडिओ पक्षांतर्गत विरोधकांनी श्रेष्ठीना पाठविल्याची चर्चा आहे सिवाय आदिवासींच्या आरक्षण बचाव मोर्चात ते भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी झाली. पक्षातीलच काही विरोधक आपल्याविरुध्द सह्यांची मोहीम राबवत असल्याचा गौप्यस्फोट होळी यांनी केला होता. पक्ष त्यांच्याबाबत काय फैसला घेणार, याची उत्सुकता आहे.

काँग्रेसकडून कोण येणार मैदानात ? आरमोरी येथे कृष्णा गजबे यांच्यापुढे काँग्रेसकडून मैदानात कोण उतरणार, याची उत्कंठा वाढली आहे. गजबे यांचा यापूर्वी २०१४ व २०२९ मध्ये माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्याशी सामना झाला. पण दोन्हीवेळी गेडाम यांना पराभव पत्कारावा लागला. यावेळी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. काँग्रेस गेडामांनाच पुन्हा मैदानात उतरविणार की नवीन चेहरा देणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!