Thursday, March 20, 2025
HomeUncategorizedना. श्री. सुधीर मुनगंटीवार २८ ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार २८ ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज

हजारोंची राहणार उपस्थिती ; कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह

मुल येथील उपविभागीय कार्यालय येथे दाखल करणार अर्ज

मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात विकासाचा झंझावात निर्माण करणारे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार येत्या सोमवारी, दि. २८ ऑक्टोबरला हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सलग सातव्या विजयासाठी सज्ज झालेले ना. श्री. मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच चाहते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे.

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार २८ ऑक्टोबरला (सोमवारी) सकाळी ११.०० वाजता मुल येथील उपविभागीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुती घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले आहे. यावेळी अर्ज भरण्यापूर्वी ना. श्री. मुनगंटीवार मतदारसंघातील नागरिकांचा आशीर्वाद घेऊन बाजार चौक मुल येथुन उपविभागीय कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यासाठी निघणार आहे.विविध विकासकामांच्या माध्यमातून मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा ना. श्री. मुनगंटीवार यांनी बदलला आहे. बल्लारपूर मतदारसंघाचे नेतृत्व करताना संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेईल एवढी विकासकामे केली.

बल्लारपूर, मुल व पोंभूर्णा येथे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सर्वांगिण विकासाचे धोरण राबविण्यावर ना. श्री. मुनगंटीवार यांचा भर राहिलेला आहे. अगदी विरोधकही त्यांचा विकासाचा झंझावात मान्य करतात. शेतकरी बांधव असोत, महिला असोत किंवा तरुणवर्ग असो प्रत्येकाच्या कल्याणासाठी व सक्षमीकरणासाठी ना. श्री. मुनगंटीवार सदैव अग्रेसर असतात. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सलग सहा विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहे . आता २०२४च्या निवडणुकीतही ते विजयासाठी सज्ज झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!