मुंबई : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
नितेश राणे म्हणाले की, काँग्रेस आणि उबाठा गटातील वादावर संजय राऊत कितीही खोटे बोलले तरी महाविकास आघातून काँग्रेस बाहेर निघण्याच्या उंबरठ्यावर आहे. पुढच्या ४८ तासांत काँग्रेस निर्णायक भूमिका घेण्याच्या मार्गावर आहे.
काल दिल्लीत झालेल्या बैठकीतून काँग्रेस नेते राहूल गांधी उठून गेले. विदर्भ, मुंबई आणि कोकणातील जागांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. पुढच्या दोन दिवसांत काँग्रेस आपली भूमिका घेईल, असे त्यांनी राज्यातील नेत्यांना स्पष्ट सांगितले आहे.”
काँग्रेस लवकरच भूमिका जाहीर करणार!
“उद्धव ठाकरे कोणालाही विश्वासात न घेता एबी फॉर्म वाटत आहेत. या जागांवर अजून महाविकास आघाडीमध्ये निर्णय झालेला नाही. काँग्रेसला फाट्यावर मारण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा ९० टक्के काँग्रेसचा निर्णय झाला आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे अस्तित्व संपवण्याचा विडा उचलल्याने राहूल गांधींना प्रंचड राग आला आहे. त्यामुळे काँग्रेस लवकरच आपली भूमिका घेणार आहे,” असेही ते म्हणाले.