ब्रम्हपुरी : तालुका प्रतिनिधी
आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी नेवजाबाई हितकारीणी उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रह्मपुरी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम तथा संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल विशेष माहिती व्हावी या उद्देशाने आज संविधानाची उद्देश पत्रिकेचा शपथविधी व वाचन विद्यार्थ्यांकडून घेण्यात आले. संविधान दिनानिमित्त प्रमुख उपस्थिती शाळेतील मुख्याध्यापक मा. श्री कपूर नाईक सर तथा शाळेचे पर्यवेक्षक मा. श्री अनिल नाकाडे सर यांनी दर्शविली. तसेच प्रमुख वक्ते म्हणून श्री मनोज गायकवाड सर तसेच श्री आशिष बोधे सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाविषयी विशेष मार्गदर्शन केलं. वरील कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांची संविधान प्रबोधन पर रॅली काढण्यात आली व विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी विविध नाऱ्यांची घोषणाबाजी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांचं स्टॅचू बनवून संविधान लिहिण्यात आले. वरील कार्यक्रमाचे आयोजन तथा सूत्रसंचालन कु. सातपुते मॅडम यांनी केले. विशेष सहाय्य श्री निलेश दोणाडकर सर श्री कानझोडे सर, कू. बालपांडे मॅडम, श्री. लाडे सर, शाळेतील संपूर्ण शिक्षक शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले. अशाप्रकारे विविध उपक्रमांच्या माध्यमातून नेवजाबाई हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालय ब्रह्मपुरी येथे संविधान दिन अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.