Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedभूसुरुंग पेरणाऱ्या मट्टामीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, भामरागडच्या आरेवाडा जंगलात ठोकल्या बेड्या

भूसुरुंग पेरणाऱ्या मट्टामीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, भामरागडच्या आरेवाडा जंगलात ठोकल्या बेड्या

गडचिरोली : सतीश आकुलवार, मुख्य संपादक

अतिदुर्गम व नक्षलप्रभावित भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ जमिनीत भूसुरुंग पेरुन जवानांचा घातपात करण्याचा कट १६ नोव्हेंबरला झाला होता. पोलिसांनी मोठ्या तत्परतेने माओवाद्यांचा हा डाव उधळून लावला होता.

दरम्यान, यातील एका आरोपीला २४ नोव्हेंबरला पोलिसांनी भामरागडच्या आरेवाडा जंगलातून अटक केली. पांडु कोमटी मट्टामी (३५, रा. पोयारकोटी ता. भामरागड) असे त्या आरोपीचे नाव आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिसंवेदनशील व माओवादग्रस्त गडचिरोलीत सुरक्षा यंत्रण अलर्ट मोडवर होती. अशातच मतदानाच्या चार दिवस आधी १६ नोव्हेंबरला भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलालगत ताडगावला जोडणाऱ्या मार्गावर स्फोटके जमिनीत पुरुन ठेवण्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी हेलिकॉप्टरने बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सी- ६० जवान व राज्य राखीव दलाच्या जवानांना तेथे पाठवले. शोध घेऊन पुरुन ठेवलेली स्फोटके घटनास्थळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आले. एक क्लोमर व दोन स्फोटकांचा समावेश होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्रे व दारुगोळा लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भामरागड ठाण्यात भारतीय दंड संहितका कलम १०९, १३२, १२६ (२), १९० , १९१ (२) (३), ६१ (२) सह कलम भारतीय हत्यार कायदा कलम ४, ५ भारतीय स्फोटके कायदा तसेच देशविघातक कृती केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात पांडु मट्टामी याचे नाव समोर आले होते. तो भामरागड तालुक्यातील आरेवाडा जंगलात असल्याची माहिती मिळाल्यावरुन उपनिरीक्षक संकेत नानोटी यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अहेरीचे अपर अधीक्षक श्रेणीक लोढा, भामरागडचे उपअधीक्षक अमर मोहिते, भामरागडचे पो.नि. दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!