Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedगोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची...

गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

गोंदिया : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

गोंदियातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवशाही बस उलटून ११ जण ठार झाले आहेत, तर अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात आज दुपारी १ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ घटना घडली. दरम्यान, या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेली माहिती अशी, गोंदिया येथे बस उलटल्यानंतर आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपघातग्रस्तांना तातडीने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवारी (दि.२९) दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे येथे होती. बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना डव्वा जवळ बस उलटून जवळपास २० फूट रस्त्यापासून घासत गेली. त्यामुळे बसमधील ११ प्रवाशांना मृत्यू झाला तर २९ प्रवासी जखमी झाले आहे. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डव्वा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच १०८ रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल होत मदत कार्याला सुरुवात केली आहे. जखमी व मृतक प्रवासी हे गोंदिया जिल्ह्यातीलच असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान भीषण अपघातामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!